शिवसेना चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

उरणमधील सातराहाटी येथे गणेश पाटील मित्र मंडळ व शिवसेना उपशहर प्रमुख श्री गणेश पाटील यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेना चषक- 2023 या रजनी क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेले आहे, स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. मनोहर भोईर व गटनेते गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. . स्पर्धेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत व कबड्डीपटू कै अश्‍विन पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी गणेश म्हात्रे, अतुल ठाकूर, संदीप जाधव, पाटील काका,जीत बंगाली, घन:श्याम कडू आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन गणेश पाटील, तुषार पाटील, पप्पू सूर्यराव, धनेश माळगावकर, निखिल सावंत, कुणाल पाटील, वैभव तिलोरे, वैभव तांडेल, सागर मसुरकर, सिद्धार्थ मसुरकर, मयुरेश पाटील, सागर मानकामे, सागर थळी, कमलेश पिंपळे, मयूर पिंपळे,दिनेश चव्हाण, संजय चव्हाण, जयेश मोकल, हेमंत थवई, रवी मोकल, चंदन भगत व कार्यकर्त्यांनी केले आह.

Exit mobile version