। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे अवधुत पाटील पुरस्कृत एकविरा आई क्रिकेट क्लब आयोजित शेकाप चषक भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि.16) ते शनिवारपर्यंत (दि.18) आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शेकापचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते सायंकाळी 8 वाजता कुरुळच्या आझाद मैदानात पार पडले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, संजय पाटील, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, अजित माळी, विक्रांत वार्डे, कूरुळ ग्रामस्थ व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्या संघास रोख रक्कम 1 लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम 50 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास 25 हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट मालिकावीरास एलईडी टिव्ही व उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजास सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला आहे.