| आगरदांडा | प्रतिनिधी |
आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण 2024 राबविण्यात येत असून, त्याकरिता मतदारयादी व विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमाचे दि. 5 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मतदान केंद्रावर विशेष शिबिर आयोजन करण्यात आले आहे.या मध्ये नमुना 6 नमुना 7 व नमुना 8 भरून नोंदणी,मतदार वगळणी व मतदार दुरुस्ती यांचे अर्ज भरून द्यायचे आहेत.तरी मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदणी करा असे आवाहन रोहन शिंदे तहसीलदार मुरुड जंजिरा तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.