प्रियांका बर्वे, आनंद भाटे यांच्या गाण्यांची मेजवानी
| पनवेल | प्रतिनिधी |
लखलखत्या दिव्यांचा उत्सव असणार्या दिवाळीच्या प्रारंभी पनवेलकरांसाठी महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि गायिका प्रियांका बर्वे यांच्या गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन वडाळा तलाव परिसरात करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर परिसराला रोषणाई आणि आकर्षक छत्र्यांनी सजविण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेच्यावतीने पनवेलकरांची दिवाळी सूरमयी व्हावी यासाठी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना दिवाळीच्या प्रारंभी नाट्यसंगीत, भावसंगीत, भक्तीसंगीतावर आधारित आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि गायिका प्रियांका बर्वे यांच्या गाण्यांची संगीतमय मेजवानी देण्यासाठी महापालिकेच्यावतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.