| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथे दिवाळी सुट्टीपूर्वी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये आकाश कंदील बनवणे, पणत्या रंगवणे, किल्ला बनवणे, भेटकार्ड बनवणे असे विविध उपक्रम पालकांच्या सहकार्याने घेण्यात आले.विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमात रममाण होऊन मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमात पालक रेश्मा भूकवार, सोनाली बानकर, सुनिता गोतकर, अमिषा मुंढे, मंजुळा लाड, शिक्षक राजेंद्र पाटील, स्मिता चिखले तसेच सर्व विद्यार्थी सहभागी झाले.