चाईल्ड केअर तर्फे आरोग्य चषक स्पर्धेचे आयोजन

| उरण । वार्ताहर ।
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण तर्फे आयोजित आरोग्य चषक आयोजन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्‍वर मैदान येथे चषकचे आयोजन करण्यात आले होते.

अंतिम फेरीत जितू स्पोर्ट करळ आणी फ्रेंड्स सोनारी या संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला. फ्रेंड्स संघाने सोनारी या संघाने जितू स्पोर्टवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज जयवंत तांडेल,उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद कडू, उत्कुष्ट श्रेत्ररक्षक हिराचंद्र तांडेल, मालिकावीर जितू कडू यांना सम्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मनोज भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणाल पाटील, विवेक पाटील, अविनाश शेठ, किशोर कडू, दिनेश ठाकूर, जगदीश म्हात्रे, संदीप तांडेल उपस्थित होते.

Exit mobile version