श्री.दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील देवकान्हे पिंपळवाडी येथे 26 रोजी श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड भूषण पुरूषोत्तम महाराज पाटील, धाटाव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गत 14 वर्षांपासून येथे श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याप्रसंगी सकाळी श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव, मूर्ती अभिषेक व पूजाविधी, सायंंकाळी 6 ते 7 रोहा कोकण दिंडी वारकरी संप्रदाय यांचे हरिपाठ त्यानंतर 8 वाजता महाप्रसाद, रात्रौ. 9 ते 11 दिनेश महाराज कडव, मु.वांदोळी यांची हरिकिर्तनरुपी सेवा, जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तर या जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ देवकान्हे -पिंपळवाडी तसेच तरूण मंडळाचे सदस्य मोलाचे सहकार्य करीत आहेत.

Exit mobile version