। खांब । वार्ताहर ।
गुरू दत्तात्रेयांचा महिमा अगाध असल्याचे भक्तीमय उद्गारदिनेश मकडव यांनी रोहा तालुक्यातील पिंपळवाडी -देवकान्हे येथे श्री.दत्त जयंती उत्सव सोहळ्यात आपल्या किर्तनरूपी सेवेप्रसंगी काढले.
गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी पिंपळवाडी – देवकान्हे येथे श्री.दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी पहाटे अभिषेक व पूजाविधी, सकाळी 11 वा. श्री.सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, तद्नंतर सायं.6 वा.कोकण दिंडी वारकरी संप्रदाय रोहा यांची हरिपाठ सेवा,रात्रौ.8 ते 9 महाप्रसाद, तद्नंतर दिनेश कडव, वांदोळी यांची सुश्राव्य हरि किर्तनरूपी व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ पिंपळवाडी-देवकान्हे, तसेच तरूण मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान या उत्सव सोहळ्यानिमित्त विभागासह संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदवून विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.