भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

तालुक्यातील पंचशील बौद्धजन समाज गोरेगाव व देशपांडे चेस अ‍ॅकॅडमी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त माणगाव तालुकास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि.11) बुद्धविहार गोरेगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी अशा दोन गटात घेण्यात येणार असून दोन्ही गटासाठी प्रवेश फी 200 रुपये ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असून दोन्ही गटासाठी एक ते सात क्रमांक व इतर वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संदीप साळवी 9764623131 व किशोर देशपांडे 8888250234 यांच्याकडे संपर्क साधावा.

Exit mobile version