एन. डी. पाटील यांच्या शोकसभेचे आयोजन

। पेण । वार्ताहर ।
खारेपाटांतील सेझ बाधित शेतकरी व स्व. एन. डी. पाटील यांच्यावर प्रेम करणार्‍या असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत पेण येथे दिवंगत आदरणीय लोक नेते, शिक्षणमहर्षि, सहकार क्षेत्रातील अग्रगणी असणारे, शेतकर्‍यांचे तारणहार, गरीबांचे कैवारी, ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरांजली वहाण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभेचा हा कार्यक्रम दि. 31 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता महात्मा गांधीवाचनालय पेण येथे मा. आ. धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी स्वर्गीय प्रा. एन. डी. पाटील यांना आदरांजली वाहण्याकरता व कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता प्रा. एन डी. पाटील यांच्या अनुयायानी व शेतकरी कामगार पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हाहन तालुका चिटणीस संजय डंगर यांनी केले आहे.

Exit mobile version