रसायनीत शोभायात्रेचे आयोजन

| रसायनी । वार्ताहर ।
विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल रसायनी यांच्यावतीने गुरुवार दि.30 मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शिवनगरगाव ते मोहोपाडागाव असे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामनवमीनिमित्त दुपारी चार वाजता शिवनगर गावातील श्री गणपती मंदिरात मुर्तीपुजन होवून शोभायात्रेला सुरुवात होईल. या शोभायात्रेत रुद्र ढोलताशा पथक, लेझिम पथक, हातात श्रीरामध्वज, वारकरी संप्रदाय पायी दिंडी आदींचा समावेश असणार आहे. यावेळी चांभार्ली थांब्याजवळील व मोहोपाडा बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून मोहोपाडा शिवाजी चौकात वामन भोईंर, सते महाराज यांच्यावतीने हिंदुधर्म जनजागृती व्याख्यान होईंल.

Exit mobile version