। अहिल्यानगर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी व राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला देण्यात आला होता. या प्रस्तावावर निर्णय होऊन ही स्पर्धा अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघास घेण्याचे पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ यांनी दिली. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांतर्फे आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, हिंद केसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, अर्जुन देवा शेळके, शिवाजी चव्हाण, नीलेश मदने, शिवाजीराव कराळे, शंकर खोसे, धनंजय खसे, दत्तात्रय खैरे, दादासाहेब पांडुळे, अतुल कावळे, पंच संभाजी निकाळजे, सोपान बाजीराव काळे, संदीप कर्डिले, शुभम जाधव, योगेश चंदेल आदी उपस्थित होते.







