। पाली । प्रतिनिधी ।
श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांच्या वतीने भक्तांसाठी व येणाऱ्या भाविकांसाठी दि. 7 ते 13 फेब्रुवारी दरम्यान माघ मासानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. या सप्ताह सोहळ्यासाठी युवा भागवत कथाकार मयुरेश केळकर यांनी भक्तांना कथेचे कथन केले. सदर सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत असताना अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला. यावेळी 56 प्रकारचे पदार्थ्यांचे भोग ठेवण्यात आले होते. हा सप्ताह दि. 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 3:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत होता. तर शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत असणार आहे. तर बुधवारी दि. 11 रोजी सायंकाळी 7 वाजता विशेष हंडी चे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताह सोहळा जुनी मठी श्री देव श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गंद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, शेखर सोमण व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांकारिता आयोजित करण्यात आला होता.







