| अलिबाग | प्रतिनिधी |
आजच्या युगात फास्ट फूडचे प्रमाण वाढत असून मुलांच्या शरीरावर व वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यादृष्टीने पौष्टिक पदार्थांचे महत्त्व समजण्यासाठी पाककला स्पर्धांचे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथे करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये 21 महिलांनी सहभाग घेऊन अनेक पौष्टिक पदार्थांची मांडणी केली होती.
गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी व केंद्र प्रमुख प्राची ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आणि परिक्षक म्हणून आक्षी ग्रामपंचायत सरपंच रश्मी पाटील व सदस्य निरजा नाईक उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रेश्मा भुकवार, अंकिता भुकवार, भावना जगू, रेश्मा तांडेल, करिश्मा भुकवार, नुतन तांडेल, सुवर्णा बुरांडे सुनिता गोतकर, मनिषा गुरव, राजश्री गण,चंदना निर्गूले, सुचिता मुंढे, रंजिता सारंग,अमोली साटविलकर, मनिषा तांडेल व इतर महिला पालक उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अर्पणा नर, द्वितीय क्रमांक अंकिता भुकवार, तृतीय क्रमांक रेश्मा भुकवार, चतुर्थ क्रमांक सुवर्णा बुरांडे आणि पाचवा क्रमांक अमोली साटविलकर यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धांचे राजेंद्र पाटील मुख्याध्यापक, स्मिता चिखले यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. चांगला उपक्रम राबवल्या बद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाककला स्पर्धांचे आयोजन
