लोकशाही दिनाचे आयोजन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. प्रसुद्या नुसार लोकशाही दिनाचे आयोजन मुरुड तहसीलदार कार्यालयात करण्यात येणार आहे. तरी सर्व तालुक्यातील शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडाव्यात असे निर्देश मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिले.

लोकशाही दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी-अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून या कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन पाळण्यात येईल. सदर लोकशाही दिन मुरुड तहसीलदार कार्यालयात 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00वाजता मार्गदर्शन सभा व लोकशाही दिन आयोजित केली आहे.

Exit mobile version