फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघर सेक्टर 15 येथील वेबवर हायस्कूलच्या मैदानात जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून तयेच शेतकरी कामगार पक्षाचे अजित अडसुळे आणि माजी सदस्या उषा अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 16 संघाने भाग घेतला होता. यामध्ये प्रथम विजेते बीवायबीएफसी आणि उपविजेते म्हणून पीएफए संघाची निवड झाली. मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून कैफ आणि बेस्ट किपर म्हणून आर्यन याची निवड करण्यात आली. यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवानंद मढवी, खारघर शेकापचे जगदीश घरत, तेजस्वी घरत, कल्पेश तोडेकर, शिवाजी पाटील, यशवंत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version