। पेण । वार्ताहार ।
क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोटर्स अकॅडमी, पनवेल येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हयातील 18 वर्षाखालील मुलांच्या एकूण 28 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उरण प्रांताधिकारी ललिता बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ललिता बाबर यांनी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत लाईन अॅकॅडमी कर्जत आणि वायुसुत ओढांगी या संघामध्ये अंतीम सामना खेळवला गेला. यामध्ये लाईन अॅकॅडमी कर्जत यांनी अंतीम विजेते पद मिळवून कोकण विभागामध्ये खेळण्यासाठी आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेचे अष्टपैलू खेळाडू म्हणून कामेश कोठेकर व धिरज बैलमारे यांची निवड झाली. तर कोकण विभागासाठी लाईन अॅकॅडमी संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून किशोर कोठेकर व प्रशिक्षक म्हणून अनिकेत म्हात्रे काम पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्नाळा स्पोटर्स अॅकॅडमी येथील अधिकारी, कर्मचारी तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच व इतर पदाधिकारी आदिंनी परिश्रम घेतले.