जयेश स्मृती चषकचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पाले गावात जयेश स्मृती चषकाचे आयोजन जय बाबदेव क्रिकेट क्लबने करण्यात आले होते. यात सोळा संघानी भाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक मरूआई क्रिकेट संघ विंध संघाने पटकावला. तर व्दितीय क्रमांक चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी संघाने पटकावला. स्पर्धेचे सामन्याचे उद्घाटन सभापती पंचायत समिती उरण यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णा पाटील, मुकुंद गावंड, रवी म्हात्रे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version