मातृवंदन पुरस्कार वितरणाचे आयोजन

| अलिबाग | वार्ताहर |

वाशी नवी मुंबई येथे रविवार 12 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री खा. जगन्नाथ पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अरुण म्हात्रे, रघुवीर थत्ते, इक्बाल कावरे, जयेंद्र खुणे, विलास गुर्जर, दिलीप मरादे, मोहन भोईर, पुंडलिक म्हात्रे, ॲड.चंद्रकांत मढवी, श्रीकांत पाटील, रामनाथ म्हात्रे, शांताराम लोखंडे, दमयंती भोईर, स्मिता वाजेकर, संदीप पाटील, प्रकाश ठाकूर उपस्थित होते.

यावेळी कल्पना देशमुख, मिनल माळी, प्रतिभा पाटील, ॲड.तृप्ती पाटील, लिला राठोड, अनंत पाटील, संतोष जाधव, राजाराम भगत, संजय पाटील, संदीप पाटील, ॲड.मनोज म्हात्रे, शांताराम लोखंडे, श्यामसुंदर गावकर यांना मातृवंदन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विशाल पाटील,सौ.व श्री.ॲड.पी.सी.पाटील, मोहनदास मुंगळे, महेंद्र कोंडे, संदेश भोईर यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर डॉ.श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भोईर यांनी केले तर सूत्रसंचालन दमयंती भोईर यांनी केले. आभार पुंडलिक म्हात्रे यांनी मानले.

Exit mobile version