नर्मदा परिक्रमा संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन

। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील श्री क्लासेस चोंढीचे संस्थापक संतोष राजाराम राऊत यांनी 12 मे रोजी नर्मदा परिक्रमा संकल्पपूर्ती करत मांडवा येथे श्री 108 महंत स्वामी राजेंद्रमुनीजी महाराज, हरिहर आश्रम भमोरी, हरदा, मध्य प्रदेश यांच्यासोबत आगमन झाले. यावेळी त्यांची जंगी स्वागतयात्रा मांडवा ते मापगाव येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली.
यादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पिंट्या गायकवाड यांनी चोंढी येथे त्यांच्या निवासस्थानी उत्स्फूर्तपणे स्वागत करत दर्शन घेतले. त्यांचे स्वागत करत व दर्शन घेण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर,आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version