राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

। गोवे कोलाड । वार्ताहर ।
महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट युनियनच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा 2021 आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील समाजभूषण पुरस्कार 2021 हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.
या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले असून याकरिता सामाजिक, कला, क्रीडा, डॉक्टर, वकील, शासकीय, प्रशासकीय, पोलीस, शैक्षणिक, उद्योजक यांनी इतर क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची निवड करून त्यांना सन्मान नारीशक्तीचा आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील समाज भूषण पुरस्कार 2021 या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपली माहिती दि.25 ऑक्टोबर पर्यंत माहितीसाठी अध्यक्ष दीपक काळींगण, 4.लक्ष्मी चाळ, टी. जे. रोड, अशोका गार्डन जवळ, शिवडी, मुंबई- 400015 या पत्त्यावर पाठवावी. अन्यथा 8097653590 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version