असोसिएशन प्रिमियर लीगचे आयोजन

Cricket wickets,ball and bat

। अलिबाग । वार्ताहर ।
सालाबाद प्रमाणे यंदाही खारेपाट असोसिएशनच्या विद्यमाने असोसिएशन प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटचे सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. सदरचे सामने 11 ते 13 मार्च रोजी तीन दिवसांचे आयोजित करण्यात आले आहेत.

हे सामने बीसीसी तिनविरा क्रिकेट मैदान सोनाफार्म तिनविरा अलिबाग येथे खेळविण्यात येणार आहेत. या असोसिएशन प्रिमियर लीगचे उद्घाटन शुक्रवारी (दि.11) सकाळी 9 वाजता अ‍ॅड.आस्वाद पाटील मा.अध्यक्ष राजिप यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ.जयंत पाटील, मा.आ.पंडीत पाटील, नृपाल पाटील रायगड बाजार चेअरमन, चित्रा पाटील राजिप सदस्या, दिलीप भोईर समाज कल्याण सभापती, राहुल अतिग्रे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्अर पोयनाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमींनी या सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अतुल पाटील अध्यक्ष, प्रमोद पाटील उपाध्यक्ष, चिरंजीव थळे सेके्रटरी-खजिनदार यांनी केले आहे.

Exit mobile version