चौल येथे पाढेपाठांतर स्पर्धेचे आयोजन

| अलिबाग । वार्ताहर ।

चौल केंद्रांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता विकसित व्हावी व त्यांनी गणित विषयात प्रभुत्व संपादन करावे या हेतुने पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा चार गटात घेण्यात आली. स्पर्धाप्रसंगी अलिबाग पंचायतसमितीचे गटशिक्षणाधिकारी के. आर.पिंगळा यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. केंद्रप्रमुख रवींद्र थळे यांनी स्पर्धेचे स्वरूप, गुणदानाचे निकष याविषयी माहिती दिली. रवींद्र वर्तक साधनव्यक्ती यांनी मुलांशी संवाद साधत पाढे व गणिताचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व गोष्टींची छानशी पुस्तके भेट देण्यात आली. या स्पर्धेत चौल केंद्रातील 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास महाले यांनी केले. आभार संदीप पाटील यांनी मानले.

Exit mobile version