द्रोणागिरी महोत्सवाचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

शांतेश्वरी आई सामाजिक संस्था उरण नवीन शेवातर्फे दि. 2 ते 10 डिसेंबर दरम्यान सांयकाळी 6:30 ते रात्री 10 वा.पर्यंत शांतेश्वरी मैदान, शिवराय चौक, नवीन शेवा, द्रोणागिरी, उरण येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (दि.3) सायं. 6.30 वा. स्टेप आर्ट निर्मित दिव्या कदम प्रस्तुत ‘श्रृंगार रस लावण्यांचा’, सोमवारी (दि.4) सायंकाळी 6:30 वा. ‘महाराष्ट्राची लोकधारा’, मंगळवारी (दि.5) सायं. 6:30वा. स्टेप आर्ट निर्मित नृत्य आणि हास्याचा नजराणा ‘जल्लोष सुवर्ण युगाचा’, बुधवारी (दि.6) सायं. 6:30 वा. कराओके गायन आणि नृत्य, गुरुवारी (दि.7) सायं. 6:30 वा. एकेरी नृत्य स्पर्धा, शुक्रवारी (दि.8) सायं. 6:30 वा. मिस रायगड स्पर्धा, शनिवारी (दि.9) सायं. 6:30 वा. महाराष्ट्रातील गाजलेले ग्रुप डान्स, रविवारी (दि.10) सायं. 6:30 वा. नितेश म्हात्रे आणि सन्नी संते प्रस्तुत ‘ही दौलत आगरी कोल्यांची’ सेलिब्रीटी शो असे विविध स्पर्धा, उपक्रम या आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सवात संपन्न होणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आई शांतेश्वरी सामाजिक संस्था नवीन शेवा उरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version