श्री काळभैरव क्रिकेट संघाची बाजी
। चणेरा । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या महीला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या सौजन्याने श्री काळभैरव क्रिकेट संघ नवखार आयोजित शेकाप चषक पावसाळी क्रिकेटचे सामने नवखार खरपा बंदर येथे खेळविण्यात आले. यावेळी श्री काळभैरव क्रिकेट संघाने शेकाप चषकावर आपले नाव कोरले.
या सामन्यांचे उद्घाटन शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते शंकर शाबासकर, विकास भायतांडेल, गोविंद राक्षीकर तसेच गोविंद भायतांडेल यांच्या हस्ते झाले. यावेळी 32 संघाने सहभाग घेतला होता. या शेकाप चषकाचा प्रथम क्रमांकांचा मनाकरी ठरलेला श्री काळभैरव क्रिकेट संघ नवखार यांना रोख 20 हजार रु. व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, द्वितीय क्रमांक श्री काळभैरव संघ नवखार यांना रोख 10 हजार रु. व चषक, तृतीय क्रमांक झिराट क्रिकेट संघ आणि चतुर्थ क्रमांक सागर सम्राट न्हावे संघाला प्रत्येकी 7 हजार रु. व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याचबारोबर पहील्या दिवशी नवखार संघाचा अभिजित सातामकर, दुसर्या दिवशी न्हावे संघाचा आदर्श सर्लेकर, तिसर्या दिवशी झिराट संघाचा मंथन डाकी आणि चौथ्या दिवशी नवखार संघाचा अमर टावरी यांनी उत्कृष्ट खेळाडूंचा मान मिळविला. तर, उत्कृष्ट फलंदाज मंथन डाकी, उत्कृष्ट गोलंदाज हर्षद टावरी, सामनावीर अमर टावरी आणि मालीकावीर जय भोईर यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी वि.वि.ध. कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष गोपीनाथ गंभे, शेकाप कार्यकर्ते शंकर दिवकर, रवी शाबासकर, मिथुन सर्लेकर, गैनीनाथ कटोरे, उत्तम राक्षीकर, अंकुश सातामकर, गणेश भोईर, राजा भायतांडेल, शुशांत राक्षीकर, असंख्य क्रिकेटप्रेमी आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सामन्यासाठी प्रदिप भोईर यांनी उत्कृष्ट समालोचन केले.







