। माणगांव । प्रतिनिधी ।
आगामी येणारे दहीहंडी, गणेशोत्सव यांसारखे सण तसेच उत्सव आनंदात व शांततेत साजरे करा, असे अवाहन माणगांव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी केले.
येणार्या विविध सण व उत्सवाच्या निमित्ताने तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखली जावी, या उद्देशाने माणगांव पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.17 ) शांतता कमिटीची सभा उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या सभेत पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सभेला शांतता कमिटीचे सभासद संजय साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, अस्लम राऊत, अल्ताफ धनसे, शर्मिला सत्वे, सरपंच शौकत रोहेकर, राजू मोरे, रवींद्र भिकू मोरे, सुभाष भोनकर, शादाब गैबी, लक्ष्मण दळवी, रमेश जैन, सुरेश जैन, प्रसाद धारिया, इरफान हाजीते, गुलजार खान, इस्माईल करदेकर, बशीर करेल, संजय ओसवाल आदींसह इतर सभासद व मोहल्ला कमिटी सभासद उपस्थित होते.