हमरापूर येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

। हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील हमरापूर गावामध्ये बँक ऑफ इंडिया ठडएढख व उमेद अभियान यांच्या मार्फत बचत गटातील महिलांना कृत्रिम दागिने बनविण्याचे व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रीती पाटील, राठोड, प्रसाद पाटील,आदी उपस्थित होते. तसेच हे प्रशिक्षण 29 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ महिलांना मिळावा म्हणून उमेद अभियानाच्या दादर प्रभाग समन्वयक प्रीती पाटील यांनी कृत्रिम दागिने बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे 13 दिवसाच्या कार्यकाळाचे आयोजन हमरापूर गावामध्ये केले आहे. प्रशिक्षणाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 अशी असणार आहे. सदर प्रशिक्षण वर्गामध्ये 28 महिलांनी भाग घेतला आहे. सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत आहे.

Exit mobile version