| पोयनाड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मौजे आंबेपुर येथील चंदरवाडी व ज्ञानवाडी येथे काल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड व चरीतर्फे करण्यात आले होते. देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री जनमन या योजनेच्या अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण व तहसीलदार अलिबाग विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 10 जानेवारी रोजी मौजे आंबेपुर येथील चंदरवाडी व ज्ञानवाडी तालुका अलिबाग येथे मंडळ अधिकारी महेश निकम व तलाठी हेमंत चांदोरकर, मनोज वाडकर तसेच प्रकल्प कार्यालय पेण प्रतिनिधी आश्रम शाळा, प्रणित पाटील सेतु व्यवस्थापक पेझारी व इथर मंडळातील तलाठी व कर्मचारी यांनी मेळावा आयोजित करण्यात आले होते. त्यात शासकीय दाखले, आधारकार्ड, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, रेशनकार्ड व इतर शासकीय दाखल्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 46 आदिवासी बांधवांना लाभ देण्यात आला असून तसेच पुढील काही दिवसात मंडळ कार्यालय पोयनाड व चरी येथील आदीवासी वाड्यांवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, या शिबिरा मार्फत आदिवासी समाजास जास्तीतजास्त लाभ देण्याचा संकल्प आहे.