| खांब | वार्ताहर |
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब, ता.रोहा या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा. ग.पोटफोडे (मास्तर) यांच्या दि.27 रोजी संपन्न 98 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धा संपन्न करण्यात आल्या. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक यांच्या संकल्पनेने प्रथमच संस्थेच्या रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब, श्रमिक विद्यालय चिल्हे व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी येथील विद्यार्थी वर्गाच्या सृजनशिलतेला वाव मिळावा यासाठी तसेच यांचे जीवन व कार्य याबाबत विद्यार्थी वर्गाला अधिक माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थी वर्गासाठी वत्कृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे, सचिव धोंडू कचरे, संचालक रामचंद्र चितळकर, राम मरवडे, धनाजी लोखंडे व तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या एका कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.