वीर वाजेकर जयंतीचे आयोजन

| उरण । वार्ताहर ।
मिठागर कामगार यूनियनचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. वीर वाजेकर यांची बुधवार दि 6 जुलै रोजी 115 वी जयंती आहे. या जयंती निमित्त सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण, येथे ज्येष्ठ मान्यवराच्या उपस्थितीत जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version