अग्निचे तांडव; भिवंडीत भंगाराची २० गोदामे जळून खाक


तब्बल ५ तासांनी आगीवर नियंत्रण
। मुंबई । वृत्तसंस्था ।

भिवंडीत पुन्हा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. आज, बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली. या आगीत २० गोदामे जळून खाक झाली आहेत. या गोदामांमध्ये भंगार असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी साडेसहाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
तत्पूर्वी, आगीच्या घटनेची माहिती मिळताच, सुरुवातीला अग्निशमन बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल पाच तासांनी म्हणजेच सकाळी साडेअकराच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Exit mobile version