अन्यथा कुटूंबासह मासेमारी करणार

शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचा इशारा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील जेएनपीटी शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाचे पुनर्वसन करण्यास सरकार उदासीन ठरला आहे. परंतु नव्या प्रस्तावित प्रकल्पाच्या जेटी विस्तारासाठी जनसुनावणी 1 डिसेंबरला घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला
आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेऊन. जनसुनावणीला विरोध केला आहे. ही सुनावणी सुनावणी घेतल्यास मोरा ते घारापूरी कुटूंबासह मासेमारी करणार असा इशारा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी दिला आहे.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत जेएनपीए प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास अद्याप मंजुरी आलेली नाही. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलता येत नसल्याचे जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावर ग्रामस्थांनी आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प या धोरणानुसार 1 डिसेंबरची सुनावणी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. प्रथम शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करावे नंतरच जेएनपीटी विस्तारीत प्रकल्पाची सुनावणी घ्यावी, असे सांगितले.

यावेळी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमानंद कोळी, रमेश कोळी यांच्यासह ग्रामस्थ, उरण तहसीलदार, जेएनपीटीचे अधिकारी उपस्थित होते.


Exit mobile version