अन्यथा माथेरानचा पर्यटन व्यवसाय धोक्यात

प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशी बिरुदावली असलेले माथेरान शहरात दिवसेंदिवस दिशाभूल वाढत असून स्थानिक प्रशासनाकडून अजूनही कोणतीही कारवाई होत नसल्याबाबतची खंत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळ माथेरानमध्ये वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. प्रदूषणमुक्त आणि वाहनमुक्त असे पर्यटनस्थळ असल्याने या पर्यटनस्थळाला पर्यटक पहिली पसंती देतात. सध्या शाळेला सुद्धा पडल्यानंतर माथेरानचा उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे पर्यटक कमी प्रमाणात दाखल झाले आहेत.


मात्र माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल वाढली आहे. काही घोडेवाले, हॉटेल व लॉजिंग दलाल, कुली हे वाहन येत नाही तोच घाटातून गाडीमागे पळतात. परिणामी लूट करण्यासाठी हे धावतात का? या विचाराने पर्यटक घाबरतात. गाडीतून उतरताच तोच गाडीला गराडा घालून वाहनतळातच जाहिरात करायला सुरुवात करतात. पर्यटकाने नकार देताच त्यांना चुकीचा रस्ता दाखवतात. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. माथेरान बाहेरील काही लोक माथेरानला विनाकारण बदनाम करताना दिसतात. माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने घातक आहे असेही स्थानिक म्हणतात.


नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी देखील घोडेवाल्यांच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दस्तुरी या ठिकाणी प्रीपेड सेवा सुरू करणे महत्वाचे आहे. ही सेवा सुरू करण्याअगोदर पोलीस प्रशासनासोबत चर्चा करणार आहोत. पालिका प्रशासनाकडून येथील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. चर्चेनंतर संयुक्त निर्णय घेऊन पुढील कारवाई करू असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.दस्तुरी येथे बाहेरून येणार्‍या प्रत्येक पर्यटकांची होणारी दिशाभूल कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज आहे.तेथील वाहनतळामधून घोडे वाले, रिक्षावाले, कुली आणि हॉटेल व लॉजचे दलाल याना बाहेर काढले नाही तर दिशाभूल मोठ्या प्रमाणात फोफावेल व माथेरानमधील गोरगरीब जनता ही कर्जबाजारी होऊन भूकबळीचे शिकार होतील. माथेरानचे पर्यटन अबधीत ठेवणे हे स्थानिक प्रशासनाच्या हातात आहे.

प्रशासनाकडून नियोजन सुरु…
माथेरान मध्ये येणारे प्रत्येक पर्यटक यांना घोडा हवा असल्यास त्यासाठी दस्तुरी नाका येथे प्रीपेड टॅक्सी सेवा सुरु करण्याबाबत नियोजन केले जात आहे. पोलीस,वन विभाग,महसूल विभाग आणि संयुक्त बैठक माथेरान पोलीस ठाणे येथे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे,माथेरान च्या प्रशासक सुरेखा भणगे,सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि वन अधिकारी उमेश जंगम अश्‍वपाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत घोड्यावाल्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या जातील आणि आवश्यक ठिकाणी अश्‍वपाल यांच्या मागणीनुसार घोडा स्टॅन्ड बनविले जातील .मात्र आठ दिवसात प्रीपेड सेवा सुरु झाल्यानंतर कोणताही अश्‍वपाल त्या योजनेचे उल्लंघन त्यांच्यावर कारवाई निर्देश मुख्याधिकारी आणि प्रशासक भणगे यांनी दिले आहेत.

पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. पोलीस दररोज दस्तुरी येथे गस्तीसाठी असतात पण तिथे फक्त पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे दस्तुरी येथे कायदा व सुव्यवस्था राहिली नाही त्यामुळे माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी माथेरान पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे.

अजय सावंत, माजी नगराध्यक्ष
Exit mobile version