आमचा कोळीवाडा लवकरच रंगमंचावर

| चिरनेर | प्रतिनिधी |

भेंडखळ येथील आई एकविरा सांस्कृतिक कलामंच प्रस्तुत आमचा कोळीवाडा हे आगरी कोळी भाषेतील धमाल नाटक लवकरच रंगमंचावर येत असल्याची माहिती कलासक्त नाट्य चळवळकार दत्ता भोईर यांनी दिली. या नाटकाची निर्मिती श्री दत्त माऊली प्रोडक्शनने केली आहे. नाटकाचे लेखन दत्ता भोईर यांनी केले आहे. तर नाटकाला शैलेश शिंदे यांचे दिग्दर्शन लाभले आहे. संगीताचा साज आनंद कुबल यांनी चढविला आहे. विशेषता शैलेश शिंदे, वासुदेव म्हात्रे, दीपक घाग, चेतन पाटील, प्रवीण भावल, आशिष गावंड, परीशा सरोदे, रुचिता म्हात्रे, मयुरी चव्हाण आदी कलाकार या नाटकातून, अभिनय साकारणार आहेत. नाट्य चळवळकार दत्ता भोईर यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचनलाय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्य सांस्कृतिक स्पर्धेत अनेक दर्जेदार नाटके व लोककला महाराष्ट्राची असे कार्यक्रम सादर करून, अनेक मानाची पारितोषिके पटकाविली आहेत.

Exit mobile version