आमच्या खेळाडूंकडे ताकद नाही,म्हणून षटकार लगावत नाहीत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारत वि बांगलादेश मालिकेनंतर बांगलादेशचे सहायक प्रशिक्षक यांनी बांगलादेशच्या खेळाडूंवर मोठे वक्तव्य केले आहे. टी-20 मालिकेतील भारतीय फलंदाज आणि बांगलादेशच्या फलंदाजांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे षटकार मारण्याची क्षमता. भारतीय फलंदाजांनी दोन सामन्यात 22 षटकार ठोकले. तर बांगलादेशला फक्त आठ षटकार मारता आले. नितीश रेड्डीने एकट्याने इतके षटकार मारले आहेत. याबाबत बांगलादेशचे सहाय्यक प्रशिक्षक निक पोथास यांना विचारले असता त्यांनी यासाठी बांगलादेशी खेळाडूंच्या शरीर प्रकृतीला जबाबदार धरले. ते म्हणाले की, 100 किलो वजन असलेला खेळाडू आणि 65 किलो वजन असलेला खेळाडू यात फरक असतो.

निक पोथास म्हणाले, त्यांच्याकडे (भारताकडे) खूप मजबूत खेळाडू आहेत. आम्ही ताकद आणि कंडिशनिंगवर काम करतो, पण तुम्ही शरीरप्रकृतीशी तर लढू शकत नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पोथास यांनी हा मुद्दा सविस्तरपणे मांडला. ते म्हणाले, जर एखाद्या खेळाडूचे वजन 95-100 किलो आणि दुसर्‍याचे वजन 65 किलो असेल, तर स्वाभाविकपणे वजनदार खेळाडू मोठा फटका मारेल. अर्थात, वेळ आणि तंत्र महत्त्वाचे आहे आणि आम्ही त्या पैलूंवर सतत काम करत आहोत. भारतीय फलंदाजांची पॉवर हिटिंग क्षमता वाढवण्याचे श्रेय पोथास यांनी इंडियन प्रीमियर लीगला दिले. ते म्हणाले, आयपीएलचाही विचार केला पाहिजे, कारण अव्वल दर्जाचे खेळाडू असलेली ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा आहे. आयपीएल आंतरराष्ट्रीय स्तरासाठी खेळाडूंना तयार करते. भारताने मारलेल्या षटकारांच्या संख्येची आमच्याशी तुलना करणे म्हणजे वेस्ट इंडिजने आमच्या तुलनेत किती षटकार मारले याची तुलना करण्यासारखे आहे.

बांगलादेशचे फलंदाज षटकार मारण्यासाठी ओळखले जात नाहीत. टी-20 सामन्यात मोठे फटके खेळणं महत्त्वाचं असतं. बांगलादेशने 178 सामन्यांत केवळ 697 षटकार मारले आहेत. त्यांना एका सामन्यात 4 षटकारही मारता आले नाहीत. सर्वाधिक षटकार लगावणार बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाह आहे. ज्याने 129 डावांत 77 षटकार ठोकले आहेत. त्या तुलनेत सूर्यकुमार यादवने अर्ध्या डावात (70) जवळपास दुप्पट षटकार (139) ठोकले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यांचा सर्वाधिक धावा करणारा शाकिब अल हसनही एका हिटसाठी 40 चेंडू घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version