। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ दिघेवाडी यांच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी चषक 2022 ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकतीच दिघेवाडी येथे पार पडली. या स्पर्धेतील अंतिम लढत ओवी इलेव्हन ऐनवहाल आणि अंबोलेवाडी या दोन संघात झाली. या सामन्यात ओवी इलेव्हन हा संघ विजयी झाला. दरम्यान, विजेत्या ओवी इलेव्हन संघास रोख रक्कम तीस हजार रु. व आकर्षक चषक, उपविजेता अंबोलेवाडी संघ वीस हजार रु. व आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांक दुरटोली या संघास दहा हजार रु. व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक श्रे राजे दिघेवाडी या संघास पाच हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर नयनेश पवार, उत्कृष्ट फलंदाज जय, उत्कृष्ट गोलंदाज महेश पवार, तर क्षेत्ररक्षक राज गोठणकर या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण दिघेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई नवतरुण मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत 24 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
ओवी इलेव्हन ऐनवहाल विठ्ठल रुक्मिणी चषक मानकरी
