पं. सदाशिव रहातेकर यांचा सत्कार

| कर्जत | प्रतिनिधी |

आजादी का अमृत महोत्सव समारोपीय वर्ष मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत कर्जत नगरपरिषदेच्या वतीने पंडित सदाशिव त्र्यंबक रहातेकर यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. वृध्द असल्याने नगरपरिषदेचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. राहतेकर यांच्या निवासस्थानी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, अभियंत्या सारिका कुंभार, कल्याणी लोखंडे, रवींद्र लाड, अविनाश पवार, बापू बेहरम, हरिश्चंद्र वाघमारे यांनी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. कर्जत येथील संस्कृत भाषेत वृत्तबद्ध काव्ये रचणारे कवी व लेखक पं. सदाशिव त्र्यंबक रहातेकर, 90 वर्षे, यांचा कर्जत नगरपरिषदेने त्यांच्या संस्कृत भाषेतील शैक्षणिक योगदानाबद्दल नुकताच सत्कार केला. ते साडेअडतीस वर्षे रेल्वेत नोकरी करुन 32 वर्षांपूर्वी चीफ यार्डमास्टर या पदावूरुन लोणावळा येथून निवृत्त झालेले आहेत.

Exit mobile version