। खांब-रोहे । वार्ताहर ।
चार दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा धो-धो बरसायला सुरुवात केल्याने शेतकरी राजाचा चेहरा आनंदित झाला आहे. तर पावसाच्या दमदार सुरूवातीने लावणीच्या कामाला दमदार सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार असे म्हणतात. त्याचप्रमाणे रोहा तालुक्यात दुबार भातशेती असल्याने रोह्याला भाताचे कोठार म्हणणे वावगे ठरणार नाही. यावर्षी मान्सून वेळेवर सुरू झाल्याने पेरणीची कामेही योग्य वेळेत व योग्य कालावधीत पुर्ण करण्यात आली. जून महिन्याच्या सुरुवातीपासून चांगल्या स्वरूपात पाऊस पडत असल्याने भाताची रोपेही लागवडीस योग्य झाल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. तर मागील काही दिवस दडी मारून बसलेल्या अखेरीस गेली दोन दिवसपासून पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने झाल्याने शेतकरी वर्गाने लावणीच्या कामाला प्रारंभ केला आहे. यंदा पाऊस चांगला बरसत असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे कोरोना चक्रिवादळा सारख्या संकटांना समोरे जाऊन दु:ख विसरून शेतकरी भातशेतीच्या कामात मग्न झाला आहे.