सन्मान संघर्षाचा! महाडच्या डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री जाहीर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आज पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशभरातून विविध क्षेत्रातल्या 128 दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे.

वैद्यकिय पेशामध्ये मोठ्या शहरात चांगले उत्पन्न आहे. मात्र या पैशाच्या मागे न जाता रायगड जिल्ह्यातील महाडसारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोकणात विंचूदंशाचे प्रमाण मोठे आहे. पूर्वी योग्य उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे विंचूदंशामुळे मृत्युचे प्रमाण मोठे होते. यावर यशस्वी उपचार पद्धती शोधुन विंचूदंशामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे उल्लेखनीय काम डॉ. बावस्कर यांनी केले. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांचे जगभरातुन कौतुक केले गेले.

त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या या कामाची दखल घेत त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाडकर आणि रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाला मिळालेला सन्मान असल्याचे मत डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version