पादुका दर्शन सोहळा

| रसायनी | वार्ताहर |

‘अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज’ दक्षिणपिठ-नाणीजधाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवारी (दि.12) सकाळी 10:00 पासून श्री कानकेश्‍वरी मैदान, नवघर पाडा बस स्टॉप शेजारी, ता. उरण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रसायनी खालापूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणातील भाविकभक्त उपस्थित राहणार आहेत.

या शुभदिनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे. तसेच, यादिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो हितचिंतक भक्त/उपासक दीक्षा घेणार आहेत.

जगद्गुरु ‘श्री’च्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच, भारतीय संस्कृतीचे जतन यावर उद्धबोधक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या महामंगलसमयी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून, गुरुपुजनचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांनी केले आहे.

Exit mobile version