। रसायनी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे गावतील गणेश हॉटेल समोर दोन कंटेनरची एकमेकांची धडक झाली. या अपघातात इंदर सिंग यादव अपघातात जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सदर अपघाताची माहिती हेल्पलाईनवर मिळताच, कर्नाळा खिंड येथील जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजधामची रुग्णवाहिका अपघातग्रस्ताच्या मदतीला तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातातील रुग्णांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या 53 रुग्णवाहिका विनामूल्य अपघात ग्रस्तांच्या सेवेमध्ये असून आतापर्यंत या सेवेतून 23 हजार 784 हून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल करून वाचविण्यात आले आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर रायगडमधील रुग्णवाहिका कर्नाळा खिंड, विट्टल कामत हॉटेल बाजूला महामार्गावरील अपघात ग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आली आहे, तरी यापुढे महामार्गावरील अपघात ग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी मो- 8888263030 / 8329425908 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.