प्राथमिक शाळा धुतूम येथे चित्रकला स्पर्धा

| उरण | वार्ताहर |

बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त रा.जि.प.प्राथमिक शाळा धुतूम येथे माजी आ. मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाने मनिषा नितिन ठाकूर व नितिन ठाकूर ह्यांनी शाळेय चित्रकला स्पर्धा व मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक शाळा धुतूममधील विद्यार्थ्यांनी मनमोहक चित्र काढले होते. पहिले ते चौथी व पाचवी ते सातवी असे दोन गट बनवून प्रत्येकी प्रथम-द्वितीय-तृतीय असे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सर्वांत प्रथम क्रमांकाचा मानकरी रचित रुपेश ठाकूर त्याच्या चित्रात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व मा.आदित्य ठाकरे यांचे चित्रे काढली. यावेळी नारायण तांडेल, विनोद ठाकूर, विक्रम ठाकूर, रेश्मा ठाकूर, करुणा घरत, अभय ठाकूर, वैशाली पाटील, संजय घरत, लक्ष्मण ठाकूर, के.बी.पाटील, सुरेश ठाकूर, संध्या ठाकूर, रणजित ठाकूर, शुभांगी ठाकूर, नरेश मोकाशी, संतोष म्हात्रे, स्मिता म्हात्रे, संपदा चव्हाण, वंदना ठाकूर, माधुरी पाटील उपस्थित होते.

Exit mobile version