। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुजग सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष योगेश वारे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.26) उलवे सेक्टर 18 येथे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील विविध शाळांमधील हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. ही चित्रकला स्पर्धा पहिला गट ज्युनियर केजी ते सीनियर केजी डीझाईनमध्ये रंग भरणे, दुसरा गट 1ली ते 4 थी राष्ट्रध्वज फडकवणार्या लोकांचे चित्र रेखाटून रंग भरणे आणि तिसरा गट 5वी ते 7वी व 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकल पालक आणि ज्येष्ठ नागरिक: प्रेरणादायक संदेश देणारी चित्रे रेखाटणे अशी पार पडली.






