। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील श्रीजा पाटील हिने राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याबद्दल तिच्यावर सर्व स्थरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. ओम साई डान्स अॅकेडमीची उत्कृष्ट नृत्यांगना श्रीजा पाटील हिने बडोदा येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत शेकडो स्पर्धकांतून प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदाकची कमाई केली आहे. तिच्या या यशाने सुधागड तालुक्यासह जिल्हा व राज्याचे नाव उंचावले गेले आहे. त्यामुळे पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते श्रीजा पाटीलचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.