। रोहा । वार्ताहर ।
ठाणे जिल्हा जलतरण असो.च्यावतीने रविवारी (दि.19) भिवंडीतील अरेना स्पोर्ट्स क्लब येथे जिल्हास्तरीय धर्मराज चषक स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध गटातील असंख्य जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला होता. त्यातील 6 वर्ष वयोगटात रोह्यातील जे.एम. राठी स्कुलचा विद्यार्थी ऋग्वेद दिनेश कुथे याने चमकदार कामगिरी करत 2 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावले आहे. ऋग्वेद कुथे हा गेली दोन वर्ष जिल्हा व राज्यस्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याने नाव कमवीत आहे. त्याच्या यशामागे त्याच्या शाळेचे शिक्षक, मुख्य प्रशिक्षक भूषण शिर्के सर, मार्गदर्शक निखिल शिंदे यांचे विशेष योगदान आहे. ऋग्वेद कुथे याने ठाण्यातील जलतरण स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.