पाकिस्ताननं आयसीसीची डेडलाईन केली मिस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपला 18 सदस्यांचा टी- 20 संघ घोषित केला. मात्र, हा टी- 20 वर्ल्डकपसाठीचा संघ नाही. त्यांनी इंग्लंड आणि आयर्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी संघ निवडला आहे. आयसीसीने वर्ल्डकपचा संघ घोषित करण्याची शेवटची तारीख ही (दि.1) मे अशी ठेवली होती. मात्र पाकिस्ताननं अद्यापही आपला संघ घोषित केलेला नव्हता. आयसीसीच्या परवानगीशिवाय प्रत्येक देश आपल्या संघात (दि.25) मे पर्यंत बदल करू शकते. याच नियमाचा फायदा घेत पाकिस्तानने संघ घोषित करण्यास विलंब केला आहे. पाकिस्तानने संघातील खेळाडूंचा फिटनेस आणि सध्याची कामगिरी याबाबत चिंता असल्यानं पीसीबीने टी- 20 वर्ल्डकपचा संघ घोषित करण्यास उशीर करत आहे. पाकिस्तान आता आपला संघ इंग्लंडविरूद्धचा पहिला टी 20 सामना झाल्यावर घोषित करणार आहे. हा सामना (दि.22) मे रोजी होणार आहे.

Exit mobile version