पाकिस्तान विरुद्ध भारत: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने

। कॅंडी । वृत्तसंस्था ।

आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. जवळपास वर्षभरानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्डकप सामन्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘अ’ गटातील भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी पाकिस्तान संघ आपला दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात त्याने नेपाळचा पराभव केला होता.

ही आहे भारत आणि पाकिस्तानची प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान : फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
Exit mobile version