| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला आपल्या घरच्या मैदानावर बांगलादेशसारख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. बांगलादेशने एकही गडी न गमावता 30 धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला. पाकिस्तानला आपल्या मायदेशात सलग नवव्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. बांगलादेशच्या संघाला हलक्यात घेणाऱ्या पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली.
पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीका करत आहेत. बाबरला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात तो अवघ्या 22 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद रिझवानने पहिल्या डावात शतकी आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून डाव सावरला पण तो संघाला विजयी करू शकला नाही.