राष्ट्रवादीला भगदाड! पाली नगराध्यक्षांचा 34 सरपंचांसह भाजप प्रवेश

। अलिबाग । विशेष । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह 34 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, 3 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सोमवारी (दि.28) भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामपंचायत निवडणूका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

Exit mobile version