श्री कोटश्‍वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात

मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी
। मुरूड । वार्ताहर ।
मुरुडची ग्रामदेवता श्री कोटेश्‍वरी मातेचा पालखी सोहळा व यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे यंदाही संपन्न झाला. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कोरोना काळानंतर गुरुवारी (दि.14) या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात बहुसंख्येने भाविकांनी सहभागी होऊन पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सव समिती व कोटेश्‍वरी देवस्थानातर्फे हा पालखी सोहळा व जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. सन 2004 पासून कोटेश्‍वरी देवस्थान मंडळ, सर्व समाज अध्यक्ष व गावातील भाविक यांच्या विचारविनिमयाने कोटेश्‍वरी मातेच्या सवाद्य पालखी मिरवणूक काढण्याची प्रथा सुरु केली आहे. दरवर्षी गावातील सर्व भाविक पालखी मिरवणूकीमध्ये भक्तिभावाने सहभागी होत असल्यामुळे कोटेश्‍वरी मातेचा पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदाने संपन्न झाला आहे.

Exit mobile version